New Mumbai tours and travels

New Mumbai tours and travels all car � service

🚖 Navi Mumbai Taxi Service | Trusted & On Time
✈️ Airport Pickup & Drop (24x7)
🚗 AC Sedan | SUV | Innova | Ertiga
📍 Navi Mumbai – Mumbai – Pune
- Mumbai darshan - maharastra darshan
Maharashtra Tourism

📞 Call / WhatsApp: 9987329693

02/05/2026

01/05/2026

🚩 १ मे महाराष्ट्र दिन 🚩

मंगल देशा
पवित्र देशा
महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा
हा महाराष्ट्र देशा
आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्रीय असल्याचा
आम्हाला गर्व आहे मराठी भाषेचा
आम्ही जपतो आमची संस्कृती आमची परंपरा आमची निष्ठा

नवी मुंबई मध्ये टॅक्सी सेवा देता देता मला आपल्या महाराष्ट्राचा जवळजवळ प्रत्येक कोपरा पाहायला मिळाल अस म्हणता येणार नाही कारण महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि खरं सांगायचं तर, जितकं पाहिलं तितकं महाराष्ट्रावरचं प्रेम वाढत जाते,रस्ते बदलले लोक बदलले भाषा तीच आहे पण वाक्य रचना कोसावर बदलते तशीच.
पण एक गोष्ट कधीच बदलली नाही ती म्हणजे माणुसकी आपुलकी आणि प्रेम.
कोकणात गेलो की मन अगदी हरवून जातं… सह्याद्रीच्या कुशीत विसावलेला हा प्रदेश म्हणजे निसर्गाचं जिवंत चित्रच आहे. हिरव्यागार डोंगररांगा, निळाशार समुद्र, आंबा-काजूच्या बागा, नारळाच्या झाडांची रांग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथली निरागस, साधी आणि मनाने श्रीमंत माणसं. खरंच, असा कोकण महाराष्ट्राला लाभला हे आपल्या राज्याचं भाग्य आहे. पण हे जपणं तितकंच गरजेचं आहे. कोकण हा फक्त पर्यटनाचा भाग नाही तर तो जिवंत सोनं आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने त्याचं संवर्धन करावं आणि स्थानिकांनीही त्याची काळजी घ्यावी
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात फिरताना मेहनती शेतकरी, सहकार चळवळ, साखर कारखाने आणि संस्कारांची श्रीमंती दिसते. कोल्हापूरची अंबाबाई, साताऱ्याचं कास पठार, सांगलीची द्राक्षं — प्रत्येक ठिकाण वेगळं, पण अभिमान वाढवणारं.
विदर्भात गेलो की कापसाची शेती, मोठमोठी जंगलं, आणि निसर्गाशी लढत जगणारा शेतकरी दिसतो. मराठवाड्यात इतिहास बोलतो लेण्या, किल्ले संत परंपरा आणि साधं संघर्षमय पण समाधानी जीवन.
एक गोष्ट मनात कायम राहिली बहुतांश आम्हाला मुंबईसारख्या ठिकाणी मराठी माणूस ग्राहक म्हणून खूप कमी भेटतो. पण अगदी मनापासून बोलणारे, विश्वास ठेवणारे , जपणारे वागणारे असतात. त्यांच्यातला जिव्हाळा वेगळाच जाणवतो
मला इतर राज्यातही फिरण्याची संधी मिळाली… पण महाराष्ट्रासारखी माणुसकी, प्रेम आणि जिव्हाळा कुठेच जाणवला नाही. इथलं माणूस कितीही मोठ्या पदावर गेलं, तरी त्याच्या मनातला साधेपणा आणि आपुलकी कायम असते. गाव.शहर. खेडं कुठेही गेलात तरी लोक एकमेकांना जपतात, संकटात धावून येतात, आणि आपलं म्हणून साथ देतात.
टॅक्सी चालवताना मला एक गोष्ट शिकायला मिळाली रस्ते वेगवेगळे असतात, प्रवासी वेगवेगळे असतात, पण भावना एकच असतात ती म्हणजे विश्वास
ड्रायव्हिंग करत असताना टॅक्सी सेवा देताना. हजारो लोक भेटले अनेक प्रवास झाले पण प्रत्येक प्रवासाने मला महाराष्ट्र अधिक जवळून समजला. हा व्यवसाय नाही फक्त, तर लोकांशी जोडलेलं एक नातं आहे.
आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं — महाराष्ट्र फक्त नकाशावरचं राज्य नाही, तर संस्कार, परंपरा, जिद्द, कष्ट या सगळ्यांचं नाव म्हणजे महाराष्ट्र.
या महाराष्ट्र दिनी आपण सगळ्यांनी मिळून आपल्या मातीतल्या या जिवंत सोन्याला — आपल्या संस्कृतीला, निसर्गाला जपूया.
जय महाराष्ट्र! 🚩🖋️ Navi New Mumbai tours and travels
#महाराष्ट्रदिन #जयमहाराष्ट्र #माझामहाराष्ट्र

05/04/2026

Address

Navi Mumbai
410218

Alerts

Be the first to know and let us send you an email when New Mumbai tours and travels posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to New Mumbai tours and travels:

Share

Category